कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत वैयक्तिक लाभ योजनेतून खरेदी केलेल्या साहित्यासाठी 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाते. त्यानुसार एप्रिल ते जुलै अखेर परिपूर्ण प्रस्ताव आलेल्या लाभार्थ्यांची निवड केली आहे. या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सोमवारी दिली.
निवड झालेल्या 1 हजार 183 लाभार्थ्यांच्या खात्यावर 77 लाख 74 हजार अनुदान जमा केले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधून अनुदान जमा झाल्याची खात्री करावी ,असे आवाहन उपाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









