प्रतिनिधी / दापोली
राज्य सामायिक परीक्षा कक्षामार्पत कृषि शिक्षण अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन केंद्रीभूत प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून अनेक विद्यार्थी व पालक यांनी प्रवेशप्रक्रियेचा अर्ज भरण्याचा कालावधी वाढविण्याची मागणी केल्याने कृषि शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याचा कालावधी वाढवून देण्यात आला आाहे. आता 23 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.
राज्यातील चारही कृषि विद्यापीठामध्ये प्रथम वर्ष ( कृषि ) साठी प्रवेशप्रक्रियेचा अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख यापूर्वी 16 डिसेंबरला होती. मात्र पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी ही अंतिम मुदत वाढवून द्यावी अशी विनंती राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडे केल्यावर आता ही मुदत 23 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.









