डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाकडे कानाडोळा
तेहरान :
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन नाकारत कुस्तीपटू नाविद अफकारी (वय 27) याला इराणने फाशी दिली. शनिवारी पहाटे अफकारी यांना शिराजमध्ये फाशी ठोठावण्यात आली. नाविद दोन वर्षांपूर्वी सरकारविरोधी निषेधांमध्ये सहभागी झाला होता आणि त्यानंतर ते इराण सरकारच्या निशाण्यावर होते. शिराझच्या आदिलाबाद कारागृहात त्यांना फासावर लटकवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 27 वषीय इराणी फ्री स्टाईल आणि ग्रोको-रोमन कुस्तीपटू नाविदने देश-विदेशात अनेक पदके जिंकली होती.









