प्रतिनिधी/ वास्को
कुवेतहून 151 प्रवासी घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान काल बुधवारी पहाटे दाबोळी विमानतळावर दाखल झाले. वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाच्या विमानातून हे प्रवासी उतरले. यात दोन बालकांचाही समावेश होता. कोविड चाचणी केल्यानंतर त्यांना बसमधून क्वॉरंटाईनसाठी पाठविण्यात आले. वंदे भारत मिशन अंतर्गंत दाबोळी विमानतळावर दाखल झालेले हे अकरावे विमान होते.









