तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात कोरोना बाधितांची संख्या वरचेवर वाढत असून आज शहरात एका रेल्वे अधिकाऱ्यासह एकूण १९ तर भोसरे येथे ५ व कुर्डू येथे १ जण बाधित असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दत्त रोड परिसरात २, शिवाजी चौक येथे २, साई काॅलनी २, काडादी चाळ १, नूतन विद्यालय परिसर २, बार्शीनाका २, रेल्वे काॅलनी १, पटेल चौक २, चौधरी प्लाॅट १, सभापती भवन १, म्हसोबा गल्ली १, ब्राह्मणचाळ १, मळा येथे १, राऊत वस्ती भोसरे ४, सम्राट अशोक नगर भोसरे येथे १ तर समर्थ नगर कुर्डू येथे १ जण असे एकूण २५ जण बाधित झाले आहेत. स्वॅबचा अहवाल येण्यास उशीर होत असून तोपर्यंत स्वॅब दिलेले नागरिक घरी विलगीकरणात न रहाता गावभर हिंडत असल्यामुळे बाधितांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. तरी प्रशासनाने व नागरिकांनीही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









