प्रतिनिधी / कुर्डुवाडी
शहरातील दुसरा व शिवाजी चौक परिसरातील पहिला कोरोना बाधीत रूग्णासह १० जण बरे होऊन घरी परतले.यावेळी आजुबाजुच्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत त्याचे स्वागत केले.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी सोमवार दि.१३ जुलै रोजी येथील शिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचेवर कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार चालू होते. आज हा बाधित रूग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, ज्येष्ठ नेते डॉ.विलास मेहता, प्रकाश शहा, राजेश गांधी, महेंद्र मेहता, शेखर कोले, वीरेंद्र भांबुरे, पोलिस अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदींसह परिसरातील नागरिक व महिलांनी उस्फुर्त स्वागत केले.
यावेळी आपल्याला या १५ दिवसात फोन करून अनेकांनी प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे आभार मानले व उपस्थितांशी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की कोणीही याबाबत भिती बाळगू नये. घाबरून जाऊ नये.ही एक त्यांची प्रोसेस असते मी दोन आठवड्यानंतर मी अगदी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो आहे.तर घाबरून जाऊ नका.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








