प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडीचे मुख्याधिकारी समीर भुमकर हे गेल्या दोन आठवड्यापासून मुख्यालयात नसल्याने त्यांना मुक्कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा आहेर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता गवळी यांनी कार्यालय निरीक्षक अतुल शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
समाज माध्यमावर याबाबतची क्लिप व्हायरल होताच शहरात याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली. सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना कुर्डुवाडी मुक्कामी राहण्यासाठी अंडरवेअर,बनियान,टाॅवेल,चादर,साबण,टूथपेस्ट, ब्रश,शाम्पू आदी वस्तू भेट स्वरूपात कार्यालयीन अधिक्षक अतुल शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी दत्ताजी गवळी, सागर व्होनमाने,धनाजी कोकरे,अतुल फडतरे,जितेंद्र गायकवाड,अभिजित सोलनकर आदी उपस्थित होते.









