प्रतिनिधी तरुण भारत संवाद / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांवर कोणाची निवड लागणार या कडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. आज दि. ६ रोजी स्थायी समिती आणि विषय समिती निवडणूक नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली. सर्व विषय समित्यांवर सत्ताधारी शिवसेनेचेच वर्चस्व राहिले. यावेळी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण हे होते. त्यांना सहाय्यक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी काम पाहिले.
विषय समिती व स्थायी समितीवर निवड झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अनिता साळवे तर सदस्यपदी नंदा वाघमारे, बबनराव बागल, अरूण काकडे व शहनाज मुलाणी यांची निवड झाली.
सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय आणि महिला बाल कल्याण समिती सभापती पदी वनीता सातव तर सदस्यपदी राधिका धायगुडे,दमयंती सोनवर,संजय गोरे व शांता पवार यांची निवड झाली.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जनाबाई चौधरी तर दमयंती सोनवर, नंदा वाघमारे, आनंद टोणपे व शांता पवार यांची निवड झाली.
शिक्षण समितीवर सभापती म्हणून पदसिध्द उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांची तर राधिका धायगुडे, बबनराव बागल,निवृत्ती गोरे व शहनाज मुलाणी यांची निवड करण्यात आली.
स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष समीर मुलाणी तर सदस्यपदी सर्व विषय समिती सभापती अनुक्रमे उर्मिला बागल,अनिता साळवे,वनिता सातव व जनाबाई चौधरी यांची निवड झाली.
या निवडीनंतर पिठासनाधिकारी राजेश चव्हाण यांचे हस्ते नुतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक धनंजय डिकोळे व प्रकाश गोरे यांचेसह प्रशासकिय अधिकारी रणजीत शिनगारे, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, पाणी पुरवठ्याचे अतुल शिंदे,रवींद्र भांबूरे, विकास बचुटे आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.