प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड पालिकेतील नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाने शहराला गेल्या चार वर्षांत विकासापासून वंचित ठेवले आहे. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी कुरुंदवाड शहर बचाव कृती समिती स्थापन करुन मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास करणार आहे. विकासाच्या आड माझा पक्ष येत असेल तर प्रसंगी पक्षाचा त्याग करण्याची तयारी असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व पालिकेतील विरोधी पक्षाचे जेष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे यांनी सांगितले.
विकास कामाच्या मुद्दयावरून डांगे यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील यांना गुरुवारी पालिका सभागृहात चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी डांगे म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून पालिकेत नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. मात्र पालिकेत नगरसेवकांऐवजी नगराध्यक्ष पुत्राचाच हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे कोणत्याही निर्णयप्रक्रियेत नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने नगरसेवक तीव्र नाराज आहेत. शिवाय जिल्हाचे पालकमंत्री सतेज पाटील नगराध्यक्षांचे जवळचे असतानाही एक रुपयाही निधी त्यांना आणता आला नाही. उलट सुधारीत नळपाणी पुरवठा, रस्ते, अशी अनेक नागरी सुविधांची कामेही रखडली आहेत. त्यामुळे नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नळपाणी पुरवठा वादग्रस्त ठरली असताना नगराध्यक्ष पाटील यांचे पुत्र विजय पाटील यानी केवळ स्टंटबाजी करत दिवाळीनंतर पाणी पुरवठा काम सुरू करण्याचे पत्रक काढून शहरवाशियांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांना घेतल्याशिवाय योजनाच होवू शकत नाही असे आव्हान देत शहराचा खुंटलेला विकास नव्याने सुरू करण्यासाठी मी पक्ष गटतट बाजूला ठेवून पालिकेतील बहुतांश नगरसेवकांना घेवून मंत्री यड्रावकर यांच्याकडून निधी उपलब्ध करुन विकास करणार आहे.
असे सांगून ते म्हणाले या विकासासाठी माझा पक्ष आड येत असेल तर प्रसंगी पक्षाचाही त्याग करण्यास तयार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी शासन म्हणून काम करावे राजकारण करु नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला नगपालिकेच्या इतिहासात अत्यंत निश्चक्रीय मुख्याधिकारी लाभला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एक खंबीर विरोधी पक्ष म्हणून आपण सातत्याने जनतेबरोबर असून सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन या शहराचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले.
Previous Articleहंगामाच्या प्रारंभीच ऊसाला फुटले तुरे…
Next Article रशिया-पाकिस्तानमध्ये होतोय पाचवा सैन्य अभ्यास









