साहित्यः एक कप मैदा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, एक चमचा गार्लिक पावडर, एक चमचा मिरपूड, एक चमचा ऑरिगॅनो, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, एक चमचा दूध, अर्धा कप पाणी, एका अंडय़ाचा पांढरा भाग, दोन कांदे आणि ब्रेड क्रम्स इत्यादी.
कृती– सर्वप्रथम एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर, मिरपूड, गार्लिक पावडर, ऑरिगॅनो आणि मीठ घाला. आता यात ऑलिव्ह ऑईल आणि पाणी घाला. सर्व घटक नीट मिसळून घ्या. आता कांद्याचे गोलाकार काप करून घ्या. हे काप पंधरा मिनिटं बाजूला ठेवा. आता कांद्याचे काप मैद्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. एका भांडय़ात अंडय़ाचा पांढरा भाग फेटून घ्या. त्यात मीठ आणि मिरपूड घाला. आता मैद्याच्या मिश्रणातले कांदे अंडय़ात घाला. या कांद्याच्या रिंग्ज एका थाळीत पसरवा. त्यावर ब्रेड क्रम्स भुरभुरा. यामुळे कांद्याच्या रिंग्ज मस्त कुरकुरीत होतील. आता एका कढईत तेल घाला. गरम झाल्यावर त्यात ओनियन रिंग्ज सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. अशा रितीने तयार झालेल्या ओनियन रिंग्ज सॉससोबत चविष्ट लागतात









