बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्यात संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्याची मागणी केली आहे. पण लॉकडाउनच्या २४ तास अगोदर, नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी हेल्थ किट उपलब्ध करून दिली जावीत. तसेस कुमारस्वामी यांनी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि इतर कामे थांबवून लोकांचे प्राण वाचवावे. तसेच जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे ही सरकारची प्रथम कर्तव्य असावे असेही ते म्हणाले आहेत.
कुमारस्वामी म्हणाले बेंगळूरमधील लॉक डाऊनचे स्वागत झाले पण कलबुर्गी, बिदर, मांड्या, बेळगाव, दक्षिण कन्नड, धारवाड, यादगीर, हसन यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही जिल्ह्यांऐवजी सर्वच जिल्ह्यांचा समावेश लॉक डाऊनमध्ये असावा असे म्हंटले आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यभर लॉकडाउन केलाच पाहिजे. नाममात्र लॉकडाउनचा काहीच उपयोग होणार नाही. उलट त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असेही त्यांनी म्हंटले आहे.









