वाळपई / प्रतिनिधी
पिसुर्ले पंचायत क्षेत्रात येणाऱया कुभांरखण डोबवाडा येथिल भागो बमो हेडगे यांच्या घरातील कपाट उघडून सुमारे चार लाखांचे सोने व रोखड लंपास केली, सदर प्रकार आज दि 29 रोजी सायंकाळी चार वाजता उघडकीस आला.
या संबंधी अधिक माहिती अशी की सदर भागो हेडगे दुपारी कामाला गेले, त्यानंतर त्यांची पत्नी फुले व भाजी विकण्यासाठी फोरेष्ट चेकपोस्ट कडे येथे गेली असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन दाराच्या बाहेर ठेवण्यात आलेली चाविचा वापर करून दार उघडून चोरटे घरात घुसले व बेडरूम मध्ये असलेल्या एका खुल्या कपाटातील चाव्या काढून ऐवज असलेले कपाट उघडण्यात आले. सदर कपाटातील मंगळसुत्र, आंगटय़ा, वेडी, तोडे व सुमारे एक लाखाच्या आसपास रोखड घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला, सदर कपाटातील अंतर्गत लॉकरच्या चावी मिळत नसल्याने चोरटय़ांनी कोयत्याच्या साहाय्याने सदर लॉकर उघडले व ऐवज लंपास केला अशी माहिती भागो येडगे यांनी दिली.
सदरची घटना भागो बमो हेडगे याची पत्नी घरी आल्यानंतर उघडकीस आली, त्यानंतर नागेश हेगडे यांनी वाळपई पोलिसांना पाचारण करण्यात आले, यांची दखल घेऊन वाळपई पोलिस निरीक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुळशिदास धुरी, सदानंद कणकुबकर यांच्यानी पंचानामा केला, त्याचं प्रमाणे चोरटय़ांचा मागोवा घेण्यासाठी पणजी येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले, त्यानुसार रात्री उशिरा श्वानपथक घटनास्थळी दाखल ंं होऊन पुढील कारवाई करण्यात आली, सदर श्वानपथक त्यांच्या घरापासून काही अंतरावर जाऊन थाबण्यात आले, सदर प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने पुढील तपास करण्यासाठी ठसेतज्ञाना पाचारण करण्यात आले. यावेळी हेडकॉन्स्टेबल अजित गावकर , पोलिस कॉन्स्टेबल रवी चौखुळकर यांनी त्यांना सहकार्य केले.
दरम्यान सदर चोरी करताना घरातील चावी काढून केल्याने, ही चोरी या घरा संबंधी माहिती असलेल्यानीच केली असावी अशी प्रतिक्रिया या वाडय़ावरील नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागात सदर प्रकराची चोरी पहील्याच वेळी घडल्यानी नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









