अंगणवाडी महिला अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयात कुपोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्याचे काम हे अंगणवाडी महिला कर्मचाऱयांचे आहे. मात्र, या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा तालुक्मयातील कुपोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना योग्य सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी अंगणवाडी महिला अधिकाऱयांना केल्या आहेत.
नुकतीच त्यांनी सुवर्ण विधानसौध येथे अंगणवाडी महिला अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. व्यासपीठावर बालविकास अधिकारी सुखसारे उपस्थित होते. सध्या बेळगाव तालुक्मयात 674 अंगणवाडी आहेत. मात्र त्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशीच आहे. त्यामुळे या अंगणवाडींची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि मुलांना योग्य आहार मिळविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज कलादगी यांनी व्यक्त केली.
बेळगाव तालुक्मयात अनेक अंगणवाडींना संरक्षक भिंती नाहीत. अंगणवाडींची अवस्था गंभीर असल्याने अनेक विद्यार्थी याकडे येण्यासही दुर्लक्ष करत आहेत. तेव्हा अंगणवाडी बालस्नेही करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी संबंधित ग्राम पंचायतींना जावून विविध योजनांतून अंगणवाडींना बालस्नेही बनविण्यासाठी प्रयत्न करा. मुलांना हसत खेळत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण करण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचारी व अधिकारी महिलांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा यापुढे तरी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि आहार द्यावा. कुपोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना योग्य आहार व इतर सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांनी सांगितले.









