शासन नियमानुसार कर आकारणी न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा कृष्णाव्हॅली चेंबरचा इशारा
कुपवाड / प्रतिनिधी
बामणोली ग्रामपंचायत व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाने बामणोली हद्दीतील कुपवाड एमआयडीसीतील तब्बल ७४ उद्योजकांना दुहेरी घरपट्टी आकारणीच्या नोटीसा बजावल्या आहेत.
या मनमानी कारभाराविरोधात कृष्णाव्हॅली चेंबरने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाच्या नियमानुसार घरपट्टी कर आकारणी करावी. तसेच एमआयडीसी व ग्रामपंचायत यांनी कुपवाड एमआयडीसीतील उद्योजकांना दुहेरी व अन्यायकारक घरपट्टी कर आकारणी करु नये, अन्यथा उद्योजकांच्या हितासाठी शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा कृष्णाव्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, सचिव गुंडू एरंडोले सर्व संचालक यांनी दिला आहे.









