कुपवाड / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरुन दोघांनी मिळून एका तरुणाला काठी व दगडाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार कुपवाड एमआयडीसीत घडला आहे. ‘तू आमच्याकडे रागाने का बघतोस ? असे विचारुन प्रवीण अशोक धायगुडे (रा.कोंडके मळा, बामणोली) याला मारहाण करून जखमी केले आहे.
याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी संशयित नितीन दुधाळ व प्रकाश माळी दोघे रा.मायाक्कानगर, बामणोली यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण धायगुडे हा मंगळवारी कुपवाड एमआयडीसीतून घरी जात होता. यावेळी मायाक्कानगर येथील नितीन दुधाळ व प्रकाश माळी हे दोघे समोरून सायकलवरून आले. दोघांनी मिळून धायगुडेला रस्त्यावर अडवले आणि ‘तू आमच्याकडे रागाने का बघतोस ? असे विचारुन काठी व दगडाने बेदम मारहाण केली. यात धायगुडे जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नागरिकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.








