प्रतिनिधी / कुपवाड कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर स्वःताचा बचाव करण्यासाठी तसेच कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांना लागणाया पीपीई कीटची निर्मिती कुपवाड एमआयडीसीच्या राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स प्रा.लि.या कंपनीत होत असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीतून महाराष्ट्रासह इतर राज्यात जवळपास 35 हजार कीटचा पुरवठा केला असल्याची माहिती कंपनीचे संचालक प्रवेश कोचेटा यांनी दिली. कोचेटा म्हणाले, राजधानी युनिव्हर्सल कंपनीत तयार झालेले पीपीई कीट राज्यातील शसकीय हॉस्पिटल, गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, आर्मी, डिफेन्स, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या शासकीय कार्यालयात किटचा पुरवठा केला आहे. कोरोना संशयित पेशंटला तपासताना कित्येकदा हा आजार त्या डॉक्टरांवरच उलटू लागला. कारण काय तर योग्य तपासणी किटचा अभाव. याचवेळी या डॉक्टरांसाठी धावून आली ती सांगलीतील राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स कंपनी. या कंपनीचे संचालक प्रवेश कोचेटा यांनी पुढाकार घेत सांगलीतील काही तज्ञ डॉक्टर व आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टरांसाठी उपयुक्त ठरणारी उत्तम दर्जाची पीपीई कीटची निर्मिती केली आणि ख्रया अर्थाने इथेच राजधानीकडून नव्या जीवनाचा आविष्कार घडला. डॉक्टरांना कोरोनाच्या आजारापासून पूर्ण सुरक्षितता मिळण्याच्या दृष्टीने योग्य ती सर्व खबरदारी या किटमध्ये घेण्यात आली. किटमध्ये लाँग बॉडी, कव्हरऑल, शू कव्हर, नाईट राईल ग्लोज, ऍरोसोला फ्री ब्रँडेड गॉगल्स, मास्क आणि डिस्पोझेबल बॅग असलेले हे किट संपूर्णपणे निर्जंतुकीकरण आहे. किटची निर्मिती व उत्कृष्ट दर्जा पाहता राजधीनीने बनवलेल्या या किटला अत्यंत अल्पावधीतच हाफकीन इन्स्टिटय़ूट, मुंबई, सिट्रा, आयएसओ अशा शासकीय मान्यता प्राप्त झाल्या आहेत. शासन व डब्ल्यू एच ओच्या निकषानुसार उच्च दर्जाचे व सुरक्षिततेची दक्षता घेऊन हे किट बनवले गेले असल्याने आज हे किट आखाती देश व जगभरात देखील अनेक ठिकाणी पुरवले जात आहे. किट बनवताना कंपनीतील कर्मचारी व कामगारांची योग्यती सर्व खबरदारी घेतली जाते. जसं मास्क, हॅण्डग्लोज, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सोबतच प्राथमिक आरोग्य काळजी या सर्व नियमांची कंपनीकडून कसोशीने खबरदारी घेतली जाते.
Previous Articleसोलापूर : त्या 41 मजुरांची 15 दिवसानंतर सुटका
Next Article उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांचे निधन?








