कुपवाड / प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रासंह जिल्ह्यात कोरोना संसर्ग अजुनही कमी होताना दिसत नाही. शासनाने कितीही कड़क कारवाईची मोहीम उघड़ली, तरीही लोक रस्त्यावर फिरतातच. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी कुपवाडमध्ये मोकाट फिरणाऱ्या २१८ जणांना पकडून ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना तपासणी केली. यात दोघेजण पॉझिटिव्ह निघाले असल्याची माहिती प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड़ व वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर औंधकर यांनी दिली.
यामध्ये विना मास्क, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, बाजारपेठेत आलेले ग्राहक, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची ॲटीजन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये २१८ पैकी ॲटीजन १५० व आरटीपीसीआर ६८ तपासण्या करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
महापालिका क्षेत्रात सांगली, मिरजेबरोबर कुपवाड परिसरातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन मंगळवारी आरोग्य पथकासह कुपवाड शहरातील रस्त्यावर उतरले. येथील संत रोहिदास चौक, मंगळवार बाजार चौक आदीठिकाणी मोकाट फिरणाऱ्याना पकडून आरटीपीसीआर व अँटीजन चाचणीची मोहीम राबवली. यामध्ये २१८ जणांची तपासणी करण्यात आली असून दोघे बाधित आढळले. त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय पथकाने सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








