स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत उपक्रम
प्रतिनिधी / कुपवाड
महापालिकेच्या प्रभाग समिती तीन अंतर्गत येणाऱ्या कुपवाडमधील एक, दोन, आठ व नऊ आदी चार प्रभागातील आरोग्य विभागाचे अधिकारी, मुकादम व कर्मचाऱ्यांनी मिळून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व घनकचरा व्यवस्थापन या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन मोहिम राबवली. या मोहिमेत चार प्रभागातील मिळून ८० पोती प्लास्टिक कचरा संकलित केला आहे, अशी माहीती वरीष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व सिद्धांत ठोकळे यांनी दिली.
पाटील व ठोकळे म्हणाले, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस व प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्याधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांच्या विशेष सहकार्याने प्रभाग समिती तीनमधील कुपवाडच्या चारही प्रभागात आरोग्य विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व घनकचरा व्यवस्थापन या मोहिमेअंतर्गत सर्वत्र फिरून प्लास्टिक संकलन मोहिम राबवली. या मोहिमेतुन ८० पोती प्लास्टिक कचरा संकलित केला. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, सिध्दांत ठोकळे, अरविंद कुलकर्णी, विकास कांबळे यांसह सर्व मुकादम व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.








