कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्गावेसलगत भरवस्तीत आयनुद्दीन मुजावर याच्या घरात खुलेआम चालणाऱ्या तीनपानी जुगार अड्डयावर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मुख्य अड्डाचालक आयनुद्दीन मुजावरसह सहा जणांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व मोबाईलसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून अटक केलेल्यांमध्ये मुख्य संशयित अड्डाचालक आयनुद्दीन अल्लाबक्ष मुजावर (वय ५१, रा.दर्गावेस, कुपवाड) यासह त्याचे साथीदार तैय्यब गफुर जमादार (वय ४४, रा.नुरइस्लाम मस्जिद जवळ, कुपवाड), सिकंदर दस्तगीर जमादार (वय ३९, रा.तराळ गल्ली, कुपवाड), गौस फरदीन मुजावर (वय २६. रा.दर्गाजबळ, कुपवाड), आदम ईलाही समलेवाले (वय ३०,रा.माळभाग, सावळी), राजू इक्बाल मुजावर (वय ४२, रा. शांतकॉलनी, कुपवाड) अशी नांवे आहेत.








