कुपवाड / प्रतिनिधी
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून गुरुवारी रात्री दोन गटात झालेल्या वादावादीचे पर्यावसान जीवघेण्या तलवार हल्ल्यात झाले. तिघांनी मिळून चिडून तिघा जणावर तलवारीने हल्ला केला. यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तिघाही हल्लेखोराना अटक केली आहे.
यामध्ये अरविंद रामचंद्र खांडेकर, विजय यशवंत कोळेकर व विलास रामचंद्र वाघमोडे (तिघेही रा.अहिल्यानगर,कुपवाड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर सांगलीच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तातडीने तिघा संशयितांना अटक केली. यामध्ये बिराप्पा चनाप्पा पुजारी (२३),अक्षय संभाजी कोळेकर (२४), प्रवीण अशोक धायगुडे (२५, तिघेही रा.कोंडका मळा, बामणोली)अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश शुक्रवारी न्यायालयाने सुनावला असल्याची माहीती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, अहिल्यानगरमधील विजय कोळेकर यांच्या वर्कशाॅपमध्ये गुरुवारी रात्री जखमी अरविंद खांडेकर,विजय कोळेकर व विलास वाघमोडे हे तिघे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी संशयित बिराप्पा पुजारी,अक्षय कोळेकर, प्रवीण धायगुडे हे तिघे हातात तलवार घेऊन आले. या तिघांनी मागील भांडणाचा विषय काढून तिघांवर प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संशयित तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच सहा. निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मिरजेचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहीती घेतली. संशयितांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांच्यासह पोलिसांनी गुरुवारी रात्रीच तिघा संशयितांना अटक केली. दरम्यान, गुह्यात वापरलेल्या तलवारी व मोटरसायकल लवकरच जप्त करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सपोनि नीरज उबाळे करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








