कुपवाड / प्रतिनिधी
अज्ञात कारणावरुन कुपवाडमधील कापसे प्लॉट येथे राहणाऱ्या दिपक आनंदा सोलनकर या तरूणावर दोघांनी मिळून चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. यात दीपक सोलनकर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी याप्रकरणी संशयित शैलेश पडळकर (रा. अहिल्यानगर) व रोहित गोसावी (रा.प्रकाशनगर, कुपवाड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक सोलनकर शुक्रवारी दुपारी प्रकाशनगर गल्ली नंबर तीनमध्ये थांबला होता. यावेळी संशयित शैलेश पडळकर व रोहित गोसावी या दोघांनी पडळकरवर कोणतेही कारण नसताना चाकूने हल्ला केला. यात।गोसावी याने मारहाण केली हल्ला केल्यानंतर संशयितांनी पलायन केले. नातेवाईकांनी जखमीला उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार शेळकंदे करीत आहेत.
Previous Articleएसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक’
Next Article …अन्यथा मी सुझलॉन कंपनीला टाळे ठोकेन









