कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील कापसे प्लॉट येथे राहणाऱ्या मोहसिन रमजान पटेल (वय ३०) हा कामगार कामावरून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पटेल यांचा ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेऊन पोबारा केला. शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत









