कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील वसंतदादा सुतगिरणी ते यशवंतनगर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आल्टो व दुचाकीची समोरासमोर जोराची धड़क झाली. यावेळी आल्टोच्या धडकेत दुचाकीस्वार सुमारे दहा फुट ऊंचीवर उडून रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
यामध्ये प्रकाश नानासाहेब जाधव (४०, रा.जुना आरग रोड, बेडग, ता. मिरज ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी मोटरसायकल व आल्टो दोन्ही वाहने जप्त केली आहेत.








