कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट प्रा.लिमिटेड या फौंड्रीतून सुपरवायझर व टेंपोचालक यांनी संगनमताने चार लाखाच्या कास्टींग साहित्याची चोरी केल्याचा प्रकार उघड़कीस आला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयातून कंपनीतील सुपरवायझर राजेंद्र सुरेश साळुंखे (३६, रा.कुपवाड मूळ गाव कोडोली, सातारा ) व टेम्पो चालक निरंजन तुकाराम चव्हाण (३६, रा.हनुमाननगर, कुपवाड) या दोघांना शनिवारी अटक केली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने राबवून त्यांच्या ताब्यातील चोरलेले चार लाखाचे कास्टिंग साहित्य व चोरीतील टेंपो मिळून सात लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.