कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडकरांना स्वतंत्र शववाहिका मिळावी म्हणून नागरिकांना तब्बल २२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. अखेर नगरसेवक गजानन मगदुम यांनी सातत्त्याने पाठपुरावा करून कुपवाडकरांची मागणी पूर्ण केली आणि कुपवाडसाठी स्वतंत्र शववाहिका मंजूर करून घेतली.
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका स्थापन झाल्यापासुन सांगली व मिरजेसाठी स्वतंत्र शववाहिकेची सोय आहे. परंतु,कुपवाड शहरासाठी स्वतंत्र शववाहिका नसल्यामुळे कुपवाडकरांना अंत्यविधीसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. कुपवाड शहरातील विस्तारीत भागातील नागरिकांसाठी सांगली अमरधाम स्मशानभुमी याठिकाणी अंत्यव्यवस्था करण्यासाठी जावे लागते. शववाहिकेशिवाय पर्याय नाही. पण, याच वेळेत सांगली उपनगरामध्ये मयत झालेस कुपवाडच्या नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत होती.
यासाठी नगरसेवक गजानन मगदुम यांनी स्थायी समिती सभेत दोन शववाहिका मंजुरीमधील एक स्वतंत्र कुपवाड शहराला देण्यात यावी, यासाठी मंजुरी घेतली. या नवीन शववाहिका गाडीची पाहणी करुन कुपवाडसाठी आता सुरू होणार आहे. यासाठी आ.सुधिरदादा गाडगीळ, शेखर इनामदार, आयुक्त नितीन कापडणीस, तत्कालीन स्थायी समिती सभापती संदिप आवटी, विद्यमान सभापती पांडुरंग कोरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे मगदुम यांनी सांगितले.








