वार्ताहर / कुद्रेमनी
कुद्रेमनी ग्राम पंचायतीच्या चुरशीच्या एकूण जागांपैकी काँग्रेस-भाजप युती ग्राम विकास महाआघाडी गटाने सहा जागा व म. ए. गटाने चार जागा जिंकल्या. त्यामुळे युती गटाचे पंचायतीवर बहुमत सिद्ध झाले आहे. गावचा विकास साधण्यासाठी नवीन होतकरू उमेदवारांना संधी मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. 10 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात होते.
वॉर्ड क्र. 1 हा म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या वॉर्डात चार जागांसाठी 9 रिंगणात होते. त्यामध्ये म. ए. समिती गटातून चार जण शांताराम कल्लाप्पा पाटील, शिवाजी रामू मुरकुटे, आरती अनंत लोहार व रेणुका रामू नाईक विजयी झाले.
वॉर्ड क्र. 2 मध्ये चार जागांसाठी 8 जणांमध्ये चुरस झाली. यामध्ये महाविकास ग्राम आघाडी पॅनेलचे अरुण पुंडलिक देवण, विनायक नारायण पाटील, मल्लव्वा नामदेव कांबळे, विमल विलास साखरे विजयी झाले.
संजय य. पाटील यांची हॅट्ट्रिक
वॉर्ड क्र. 3 मध्ये दोन जागांसाठी पाच जणांमध्ये लढत झाली. यामध्ये युती गटातून संजय यल्लुप्पा पाटील व लता चंद्रकांत शिवनगेकर विजयी झाले. या वॉर्डातून संजय पाटील सलग तिसऱयांदा विजयी झाले.
निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. आता ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.