पोलिसांना बसला दणका, आयोजकांना नाहक झाला त्रास
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण होऊन बेळगाव तालुक्मयात शांतता भंग होण्याची शक्मयता आहे, असे कारण पुढे करुन काकती पोलिसांनी पोलीस उपायुक्त आणि स्पेशल एक्झिकेटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्याकडे फिर्याद दिली. त्यानंतर उपायुक्तांनी कुदेमनी मराठी साहित्य संमेलकांच्या आयोजकांना नोटीस बजावली. तसेच जामीनसाठी अट घातली. त्या विरोधात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने हा खटला रद्दबातल ठरविला आहे. यामुळे पोलिसांना चांगलाच दणका बसला आहे.
कुदेमनी येथे दरवषीच साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. 2020 मध्येही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन नागेश निंगोजी राजगोळकर, काशिनाथ आप्पाणी गुरव, मोहन केशव शिंदे, मारुती वैजू गुरव, शिवाजी महादेव गुरव, गणपती पांडुरंग बडसकर यांच्यासह इतरांनी केले होते. त्यानंतर पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण होते म्हणून या सर्वांना नोटीस बजावली होती.
आयोजकांना 6 महिन्यासाठी 50 हजार रुपयांचा बॉन्ड व तितक्मयाच रकमेचे दोन जामिनदार देण्याचा आदेश बजावले होते. त्या आदेशाला ऍड. महेश बिर्जे यांनी मुख्य जिल्हासत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर हा खटला अकरावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. त्या ठिकाणी न्यायाधीशांनी हा खटला चौकटीत बसणारा नाही तसेच पोलीस उपायुक्त व आयुक्तांनी आयोजकांची बाजू ऐकूण घेणे गरजेचे होते. मात्र पोलीस अधिकाऱयांनी वरि÷ पोलीस अधिकाऱयांकडे तक्रार करुन न्याय मागितला. त्या वरि÷ पोलीस अधिकाऱयांनी कोणतीही चौकशी न करता आयोजकांना जो आदेश दिला तो कायद्याच्या चौकटीत नाही. हा आदेश एकतर्फी आहे, अशी बाजू ऍड. महेश बिर्जे यांनी न्यायालयात मांडली. आयोजकांची कोणतीच बाजू या पोलीस अधिकाऱयांनी ऐकून घेतली नाही. वास्तविक साहित्य संमेलन हे भाषेच्या विकासासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी आयोजित केले जाते. कोणाविषयी द्वेष करण्याचा प्रश्नच नाही. असे असताना अशा प्रकारे आयोजकांना नोटीस बजावणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनांमुळे बेळगावच्या शांततेला बाधा पोहोचविण्याचे जे म्हणणे पोलिसांनी मांडले आहे ते चुकीचे आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीशांनी आयोजकांची बाजू उचलून धरत 20 फेब्रुवारी 2020 रोजीचा आदेश रद्दबातल ठरविला आहे. या आयोजकांतर्फे ऍड. महेश बिर्जे, ऍड. एम. बी. बोंदे यांनी काम पाहिले.
मराठी भाषिकांनी केला होता विरोध
कुदेमनी येथील साहित्य संमेलन आयोजकांना नोटीस बजावल्यानंतर त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. मराठी भाषिकांनी एकजुटीने त्याला विरोध केला होता. मात्र नाहक त्रास देण्यासाठी पोलिसांनी आपला रेटा सुरूच ठेवला. या घटनेनंतर माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, शिवाजी शिंदे यांच्यासह इतरांनी पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. तरी देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या.