कुदनूर परिसरातील शेतकरी हतबल. पावसामुळे भात मळण्या पाण्यात
वार्ताहर / कुदनूर
पावसाच्या भीतीमुळे कुदनूरसह परिसरातील लांबावलेल्या भात पिकाच्या मळण्या अचानक आलेल्या पावसात अडकल्याने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. अचानक ओढवलेल्या संकटाने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून, भात मळण्यांमध्ये पाणी भरल्याने पुन्हा हतबल झाला आहे.
कुदनूरसह कालकुंद्री, किटवाड, होसूर, कागणी, तळगुळी, दिंडलकोप आणि खन्नेटी आदी ठिकाणी अंदाजे 40 टक्के भात पिकाच्या मळण्या पावसाच्या भीतीपोटी खोळंबल्या होत्या. अचानक येत असलेल्या पावसामुळे भात पिकाची कापणी काही भागात झाली नव्हती. तर काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शिवारात जाण्याजोग्या वाटा झाल्या नसल्यानेही कापणी केलेले भात पिक मळणी करण्याच्या प्रतीक्षेत होते. पावसाने दोन दिवसापासून दिलेली उघडीप पाहून शेतकऱयांनी भात पिकाच्या मळण्यांचा करायचे योजिले होते. सगळीकडे एकदम भात मळण्या योजिल्याने काहींना माणसांची आणि यंत्रांची जुळणी करता आल्याने मळण्या सायंकाळपर्यंत आटोपल्या तर काहींच्या मळण्या माणसांच्या कमतरते अभावी पावसातच अडकल्या. तर कापणी अभावी शिवारात उभे असलेले भात पिक पावसामुळे झडून गेले आहे.
खळ्यावर पाणी; वैरण भिजले
दिवसभराच्या भात मळणीतील भाताला वारे देतानाच सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे खळÎावरच भात गोळा करुन झाकावे लागले. मात्र, रात्रभर झालेल्या पावसाने खळÎावर पाणी तुंबल्याने गोळा करुन झाकलेले भात पूर्णतः भिजून गेले आहे. भात पूर्णतः भिजल्यामुळे आणि शिवारात पाणी तुंबल्याने ते भात वाहतूक करुन आणण्याचे कसे ? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. याशिवाय मोठÎाप्रमाणात वैरण पावसात गावल्यामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्नही भेडसावत आहे.
तातडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी…
शेतकऱयावर यापूर्वीही पूराचा सामना करावा लागला होता. आत्ता पुन्हा आस्मानी संकट ओढवल्याने शासनाने तातडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशीही मागणी शेतकऱयांकडून केली जात आहे.