घरामध्ये कुत्रा पाळण्याचा शौक बहुतेकांना असतो. घरात विविध ब्रीडची कुत्री पाळतो, अर्थात त्यांची काळजी घ्यावी लागतेच. परंतू घरातील कुत्र्यांवरचे प्राणीप्रेम जरा जपूनच करावे. अन्यथा त्याचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो.
लक्षात ठेवा
- घरात जर मोठे कुत्रे असेल तर प्रत्येक सहा महिन्यांमध्ये कुत्र्याची वैद्यकीय तपासणी जरूर करून घ्यावी.
- लहान वयाचा कुत्रा असेल तर प्राण्यांच्या डॉक्टरकडे जरूर घेऊन जावे.
- कुत्र्याचे तोंड अस्वच्छ असेल तर कुत्र्याला अनेक आजार जडू शकतात. त्यामुळे कुत्र्याचे दात स्वच्छ असले पाहिजेत.
- कुत्र्याच्या जीभेवरील जीवाणू प्राणघातक- घरात कुत्रा असेल तर तो प्रेमाने मालकाला चाटतो, अंग घासतो. मालक म्हणून आपणही त्याचे लाड करतोच मात्र कुत्रा जीभेने तुम्हाला चाटत असेल तर सावध व्हा. पाळीव कुत्रे आणि मांजरे यांच्या जीभेवर असलेला कॅप्नोसिटोफैगा कॅनिमोरससस नावाचा जीवाणू अत्यंत प्राणघातक ठरू शकतो.
- सर्वसामान्यतः हा जीवाणू प्राण्यांनी चावल्यास शरीरात प्रवेश करतो मात्र जर्मनीमधील काही डॉक्टरांच्या समूहाने नुकताच या गोष्टीचा खुलासा केला आहे की केवळ कुत्र्याच्या चावण्याने नव्हे तर चाटल्यामुळेही हा धोकादायक विषाणू व्यक्तीच्या शरीरात संसर्ग करू शकतो.
- जर्मनीतील एका 63 वर्षीत व्यक्तीला त्याच्याच पाळीव कुत्र्याने चाटले होते. त्यामुळे या व्यक्तीला संपूर्ण शरीरभर संसर्ग झाला. केवळ संसर्ग झाला असे नाही तर त्याला गॅँगरीन, निमोनिया याबरोबरच 106 अंश तापही होता. 2 आठवडे रूग्णालयात काढल्यानंतरही या व्यक्तीचे प्राण वाचू शकले नाहीत.
- या व्यक्तीच्या चेहर्यावर डाग आले, त्यानंतर संसर्ग त्याच्या नसांमधून पायापर्यंत पसरला. मूत्रपिंड आणि यकृत यांनाही त्याचा संसर्ग झाला. जीवाणूचा दुष्परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठले. त्यामुळे रूग्णाची त्वचा सडली. शेवटी हृदयाचे ठेके थांबले.
- ज्या व्यक्तींची प्रतिकारक्षमता कमी असते त्यांच्यावरच जीवाणूचा परिणाम होतो. परंतू या व्यक्तीच्या उदाहरणावरून कोणत्याही व्यक्तीला जीवाणू आपल्या विळख्यात घेऊ शकतो. पाळीव प्राणी असलेल्या घरांमध्ये जर कोणालाही ताप आला असेल तर वैद्यकीय मदत जरूर घेतली पाहिजे.