ओटवणे/ प्रतिनिधी-
आंबेगाव आणि कुणकेरी या दोन गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री देवी भावई विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या सोसायटीच्या चेअरमपदी नामदेव विनायक नाईक यांची तर व्हाईसचेअरमनपदी सोनिया संजय सावंत यांचीएकमताने निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक प्रमोद मोहन सावंत, सखाराम कृष्णा सावंत, भिवाजी अंकुश नाईक, तुकाराम बाबू राऊळ, बुधाजी विष्णू गावडे, भरत नारायण सावंत, बाळकृष्ण पांडुरंग परब, नामदेव गंगाराम सावंत, मधुमती पांडुरंग गावडे, राजन पूनाजी बरागडे, सुरेश नावसो जाधव उपस्थित होते. यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून आर. आर. आरावंदेकर यांनी पाहिले.
यावेळी नूतन अध्यक्ष नामदेव नाईक यांनी संस्थेच्या व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ व आंबेगाव आणि कुणकेरी गावातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांना विश्वासात घेऊन या सोसायटीच्या प्रगतीसह शेतकरी व लघु उद्योजकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.









