प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर ) येथील ५५ वर्षीय शासकीय पुरवठा कार्यालयातील कर्मचार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी त्यांच्या कुटुंबातील आई, पत्नी, मुलगा, मुलगी व नात अशा पाच जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या नजिकच्या संपर्कातील उपचार करणाऱ्या स्थानिक डॉक्टरांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कुडित्रेतील कोरोना बाधितांची एकूण संख्या ७ झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
कुडित्रे येथील प्रथम बाधित हे सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागाकडे अव्वल कारकून म्हणून नोकरीला आहेत. ते शुक्रवारी दि. १० रोजी चंदगड येथे रास्तभाव धान्य दुकान तपासणीसाठी गेले होते. ताप, कणकण जाणवू लागल्यामुळे त्यांनी गावातील स्थानिक डॉक्टरकडे तपासणी केली. पण त्रास वाढत्याने मंगळवारी दि. १४ रोजी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता.
बुधवारी दि.१५ रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कुटुंबातील आई, पत्नी, मुलगा,मुलगा व नात यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले दिले होते. तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांचाही स्वॅब घेण्यात आला होता. या सर्वांचे तपासणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे कुडित्रे येथील एकूण बाधितांची संख्या सात झाली आहे. शुक्रवारपासून कुडित्रे येथे तीन दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला असून सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleबार्शीतच कोरोना प्रयोग शाळेस परवानगी द्या – आमदार राऊत
Next Article धामापूर भायजेवाडी बंधाऱ्यात दोघांचा बुडून मृत्यू








