प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ एस. टी. आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी आठ दिवसांपूर्वी अंतर्गत काही ठराविक बसफेऱ्या सुरू केल्यानंतर आता या आगाराची मातृफेरी म्हणून ओळख असलेली कुडाळ-विजापूर ही बसफेरी शुक्रवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता, कुडाळ येथून सकाळी 6.30 वाजता व सायंकाळी 7.30 वाजता अशा दरदिवशी दोन कुडाळ-विजापूर फेऱ्या 25 जूनपासून सुरू करणार.
तसेच सोमवारपासून कुडाळ-रत्नागिरी व कुडाळ- कोल्हापूर या मार्गावर बसफेऱ्या सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपला जिल्हा कोरोना प्रभावातून तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्मयता आहे. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक फेऱ्यांचे प्रमाण वाढविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.









