प्रतिनिधी /बेळगाव
कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज, बेळगावतर्फे समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा, कोजागरी पौर्णिमा व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यानंतर गायन कार्यक्रम ज्ञाती बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
श्रीमद् पूर्णानंद स्वामींच्या प्रतिमेला अध्यक्ष मिलिंद खानोलकर व सदस्य डॉ. गिरीधर पाटील यांच्या हस्ते हार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणानंतर खजिनदारांनी वार्षिक ताळेबंद वाचन केले. एस. वाय. प्रभू यांनी समाजाविषयी थोडक्मयात माहिती दिली.
यावेळी गौतमी सामंत, सानिका ठाकुर, रेखा परुळेकर यांनी गीते सादर केली. शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगल आजगावकर यांनी केले.









