दोन्ही तालुक्मयांत कोरोना आलेख वाढताच : बरे होणाऱया रुग्णांची संख्या आजही बाधितांपेक्षा अधिक
- नव्याने 550 बाधित रुग्ण, बरे झाले 754 रुग्ण, 13 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कुडाळ व कणकवली तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून दोन्ही तालुक्मयांत कोरोना बाधित रुग्णांचा आलेख वाढतच आहे. मंगळवारीही नव्याने आढळलेल्या 550 रुग्णांमध्ये कुडाळ व कणकवली तालुक्मयातच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान मंगळवारी मात्र कोरोना बाधित 550 रुग्णांपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्या 754 एवढी अधिक प्रमाणात राहिली. तर तेराजणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 35 हजार 256 वर पोहोचली असून यामध्ये कुडाळ तालुक्मयात 6 हजार 933, तर कणकवली तालुक्मयात 6 हजार 783 रुग्ण संख्या झाली आहे. दोन्ही तालुक्मयांत रुग्ण संख्या उच्चांकी आहे. तसेच मंगळवारी आढळलेल्या 550 रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्मयात 110 आणि कणकवली तालुक्मयात 111 रुग्ण आढळले आहेत. हे सुद्धा सर्वाधिक आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके हॉटस्पॉट ठरले आहेत.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत सातजणांचा मृत्यू झाला असून यापूर्वी झालेल्या तालुक्मयातील सहाजणांचीही मृत्यूमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे तेराजणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 888 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मंगळवारी बरे झालेल्या 754 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 27 हजार 717 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्हय़ात सध्या 6 हजार 645 सक्रिय रुग्ण असून त्यातील 373 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी 333 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 40 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
मंगळवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 88, दोडामार्ग – 8, कणकवली – 111, कुडाळ – 110, मालवण – 89, सावंतवाडी – 61, वैभववाडी – 26, वेंगुर्ले – 55, जिल्हय़ाबाहेरील – दोन.
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 4294, दोडामार्ग – 2097, कणकवली – 6783, कुडाळ – 6933, मालवण – 5211, सावंतवाडी – 5159, वैभववाडी – 1573, वेंगुर्ले – 3030, जिल्हय़ाबाहेरील – 176.
सक्रिय रुग्ण : देवगड – 928, दोडामार्ग – 228, कणकवली – 1210, कुडाळ – 1233, मालवण – 1356, सावंतवाडी – 776, वैभववाडी – 297, वेंगुर्ले – 586, जिल्हय़ाबाहेरील – 29.
आजपर्यंतचे मृत्यू : देवगड – 123, दोडामार्ग – 26, कणकवली – 178, कुडाळ – 138, मालवण – 159, सावंतवाडी – 131, वैभववाडी – 61, वेंगुर्ले – 68, जिल्हय़ाबाहेरील – चार.
आजचे तालुकानिहाय मृत्यू : देवगड – दोन, कणकवली – एक, कुडाळ – दोन, मालवण – दोन, सावंतवाडी – तीन, वैभववाडी – दोन, वेंगुर्ले – एक,
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने – मंगळवारी 2,199, एकूण 1,27,639. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 25,018. ऍन्टिजन टेस्ट – तपासलेले नमुने मंगळवारचे 2,994, एकूण 1,19,542, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 10,486.
आणखी तेराजणांचा कोरोनाने मृत्यू
जिल्हय़ात आणखी तेराजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मालवण येथील 62 वर्षीय पुरुष, तर खुडी येथील 47 वर्षीय महिला, कुडाळ-ओरोस येथील 48 वर्षीय पुरुष, कणकवली-तळेरे येथील 49 वर्षीय पुरुष अशा चार रुग्णांचा सामावेश असून हे मागील 24 तासांतील मृत्यू आहेत व यापूर्वीचे नऊ मृत्यू असून त्यांची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही.








