रविवार १३ फेब्रुवारीला मराठा हॉल येथे आयोजन
सावंतवाडी/ प्रतिनिधी-
मराठी नाटकांची सुरूवात संगीत रंगभूमीपासून झाली. काळानुरूप संगीत रंगभूमीचे महत्त्व हळूहळू लोप पावत जाऊन संगीत नाटके सादर होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आजही काही संस्था प्रयत्नशील असून जुनी संगीत नाटके पुन्हा एकदा नव्या दमाने रंगभूमीवर सादर होत आहेत. संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करणारे एक प्रमुख नाटक म्हणून संगीत मत्स्यगंधा या नाटकाकडे पाहिले जाते.
समस्त पुरुष जातीवर सूड उगवण्याच्या हेतूने जिद्दीला पेटलेली सत्यवती, प्रतिज्ञाबद्ध भीष्म, ऋषितुल्य पराशर, सम्राट शंतनु, राजकन्या अंबा या प्रा. वसंत कानेटकरांच्या समृद्ध लेखणीतून साकारलेल्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांनी नाटक उलगडत जाते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली “देवाघरचे ज्ञात कुणाला, साद देती हिमशिखरे, गर्द सभोवती, गुंतता हृदय हे, अर्थशून्य भासे अशा अनेक लोकप्रिय नाट्यगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.
श्री परमेश्वर निर्मित, बाळ पुराणिक दिग्दर्शित, क्षितिज इव्हेंट सावंतवाडीच्या “संगीत मत्स्यगंधा” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये होत आहे. सकाळी ९.३० आणि सायंकाळी ५. ३० वाजता नाट्य रसिकांना नाट्यानुभूती मिळणार आहे.
या नाटकात सौ दिव्या शेवडे, स्वप्नील गोरे, बाळ पुराणिक, गणेश दीक्षित, योगेश प्रभू, आशुतोष चिटणीस, केतन सावंत, पियुषा प्रभुतेंडोलकर आदी कलाकारांचा समावेश असून नाटकासाठी संगीत मार्गदर्शन स्वप्नील गोरे करीत आहेत. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन क्षितिजतर्फे करण्यात आले आहे.
तिकिटाकरिता कुडाळ संपर्क:- श्री भाऊ बाक्रे
प्रथमेश मेडिकल – कुडाळ
9422390062/ 7066479162
सौ. उमा जड्ये – 7588447469
सावंतवाडी संपर्क* –
राजश्री फोटो स्टुडिओ
बाळ पुराणिक – 9422436147
( टिप – कोवीड १९ बाबतचे शासनाचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील)









