प्रतिनिधी/ महाड
पोलादपूर तालुक्याच्या दुर्गम भागातील रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी कुडपण गावाजवळ खोल दरीत वऱहाडाचा ट्रक कोसळल्याने तालुक्यातील रस्ते सुरक्षित नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. या अपघाताला चालकाएवढेच प्रशासन आणि वाहतूक पोलीसही जबाबदार असल्याने ट्रक अपघाताबाबत सर्व घटकांच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. पोलिसांच्या तपासणी नाक्यांवरील ‘व्यवस्थे’बाबत यामुळे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
पोलादपूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व डोगराळ भागातील मार्गावर शुक्रवारी सायंकाळी लग्नाचे वऱहाड घेऊन चाललेल्या ट्रकला झालेल्या अपघातामध्ये तिघाजणांना आपला जीव गमवावा लागला तर 63 जण जखमी झाले. सातारा जिह्यातील कोडूशी या गावांतील नवरी मुलगी आणि खेड तालुक्यांतील खवटी गावांतील नवरा मुलगा यांचा लग्न समारंभ संपल्यानंतर कुडपण मार्गाने खवटी गावाकडे जात असताना हा अपघात झाला. ट्रकमध्ये एकूण 66 वऱहाडी होते. अवघड वळणावर चालक नीलेश दळवी याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक (एमएच 08 जी.-3027) खोल दरीमध्ये कोसळला. या अपघातात तुकाराम दत्तू झोरे (40, कावळे कुंभार्डे ता. महाड), विठ्ठल बक्कु झोरे (65, खवटी ता. खेड) व भावेश हरिश्चंद्र होगाडे (23, तुळशी धनगरवाडी, ता. खेड) यांचा मृत्य़ू झाला. तसेच 63 जण जखमी झाले.
कुडपण अपघातांमधील जखमींची नावे
सुभाष बबन माने (20), प्रदीप पांडुरंग झोरे (45, कुभार्डे ता. महाड), दत्ताराम जानू झोरे (45), अर्जुन लक्ष्मण झोरे (14), सलमान करिम मुडेकर (17), आनंद दीपक कासारे (19, शिरसावणे ता.महाड), विवेक विजय गावडे (24, वनवडे ता.खेड), अनंता बाबु आखाडे (35), सीताराम बाबू पवार (82), रमेश गंगाराम झोरे (23), यशवंत बाबु ढेबे (50), संतोष अनंता आखाडे (23), गंगाराम लक्ष्मण झोरे (50), संजय विठ्ठल झोरे (35), रामचंद्र बाबु ढेबे (60), प्रकाश लक्ष्मण झोरे (40), नीलेश दत्ताराम दळवी, सुनील बारक्या झोरे (30), उज्ज्वला ढेबे (30), सुनील ढेबे, समीर झोरे, कविता संतोष झोरे, कांता प्रकाश झोरे, (27, ट्रक ड्रायव्हर, सर्व राहणार खवटी ता. खेड), राजेश बाबू टेडे (53, तुळशी ता. खेड), विठ्ठल धोंडू खुटेकर (62), रामचंद्र बाळू खुटेकर (40), रमेश नितीन खुटेकर (17), बारकु बाळू झोरे (60), यशवंत चंद्रकांत खुटेकर (60, सर्व कोतवाल ता. पोलादपूर), तेजस लक्ष्मण खुटेकर (परसुले ता. पोलादपूर), विवेक विजय गावडे वनवासी, सयद महमद जोगिलकर (फिर्यादी, शिरसावणे) सिध्दी विलास झोरे, गंगुबाई विठ्ठल झोरे (कुभार्डे ता.महाड)
वऱहाडी जखमींमध्ये बहुतांशी खेड तालुक्यातील असल्याने त्यांना रत्नागिरी येथील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यातील सातजण गंभीर जखमी असल्याने त्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी 15 जखमींवर महाडमधील डॉ. रानडे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांतील दहाजणांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एका जखमीला डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोगय विभागाकडून देण्यांत आली. 7 जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. विविध रुग्णालयामध्ये दाखल सर्व रुग्णांची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने व त्यांच्या पथकाने व्यक्तीश: भेट घेऊन जखमींवर उपचार केले. पालकमंत्री अदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडूनही मदत कार्याला गती देर्यात आली.









