कनवाड परिसरात शोककळा उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
प्रतिनिधी / शिरोळ
कुटवाड ता. शिरोळ येथील नायब सुभेदार राजेंद्र धोंडीराम पाटील यांचे सेवेत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटवाड, कनवाडसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहून गावकरी गहिवरले गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचा पार्थिव देह कुटवाड गावात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कुटवाड येथील राजेंद्र पाटील हे चोवीस वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. ते सध्या दिल्ली येथे नायब सुभेदार या पदावर कार्यरत होते. तीन महिन्यापूर्वीच कुटवाड गावी आले होते. कुटवाड मध्ये आई वडील दोन भाऊ भावजय असा एकत्र कुटुंब परिवार आहे.
दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या आई वडिल भावांच्या बरोबर खुशालीचे बोलणे झाले होते. आज अचानकच मृत्यूची बातमी समजताच आई वडील भाऊ नातेवाईक यांच्यासह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटील हे मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील भाऊ भावजय पत्नी एक मुलगा दोन मुली आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.









