ऑनलाईन टीम / पुणे :
कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलावर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे (वय 22) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या कॉमन मित्रांपैकीच एक होता. दोघेही मागील अडीच वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपी प्रथमेश याने 27 ऑगस्ट 2020 ते 17 मार्च 2022 दरम्यान वेगवेगळय़ा लॉजवर नेऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकावले. त्यानंतर पीडितेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात प्रथमेश मारणेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
मारणे याच्यावर भा. दं. वि. कलम 376, 504, 506 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे कलम 66 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.








