ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुख्यात गुंड अंकित गुर्जरची तिहार कारागृहातील बराक तीनमध्ये आज सकाळी हत्या करण्यात आली. गुंडाच्या हत्येने तिहार तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली असून, अंकितच्या कुटुंबियांनी तुरुंग अधिकाऱ्यांवर खुनाचा आरोप केला आहे.
कुख्यात गुंड अंकित गुर्जर हा उत्तरप्रदेशच्या बागपतमधील खैला गावचा रहिवाशी आहे. त्याला गावचे माजी सरपंच विनोद यांच्या हत्येप्रकरणी हरियाणात झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पंचायत निवडणुकीत अंकितची पोस्टर्सही गावात चिकटवली गेली होती.









