प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, सोलापूर येथे दरोडा, मारामारी, लुट तसेच खूनाचा प्रयत्न या गंभीर गुह्यांसोबत पोलीस दलावर तीन वेळा गोळीबार करुन पसार असणाऱया मोक्यातील आरोपींबरोबर कोल्हापूर पोलिसांची झटापट झाली. यामध्ये पोलीसांनी दोघा कुख्यात गुंडांना जेरबंद करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल, 20 जिवंत राउंड, तीन मॅगजीन अशी शस्त्र हस्तगत केली. अप्पा उर्फ सुभाष ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी ता. माळशिरस, जि. सोलापूर), पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (वय 24 रा. वडले, ता. फलटण जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. शिवाजी विद्यापीठ परिसरात बुधवारी रात्री हि कारवाई केल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरोडा, रॉबरी, खंडणी
पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अजय वाडेकर, सचिन पाटील, अनिल पास्ते, नामदेव यादव, रणजित पाटील, संदिप कुंभार, सागर कांडगावे, राम कोळी, वैभव पाटील, यांच्यासह शिघ्र कृती दलाच्या जवानांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.