कुंभोज/प्रतिनिधी
कुंभोज ता हातकलंगले येथे आज आधुनिक शेतकरी रविराज जाधव व अमोल कदम यांच्या ऊस शेतामध्ये क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल शेती विभागाच्या माध्यमातून ऊसावरती ड्रोनच्या द्वारे औषध फवारणीचा पहिला प्रयोग करण्यात आला व सदर प्रयोग यशस्वी झाला यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून सदर ड्रोन फवारणी मुळे शेतकऱ्याचा वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
किरण पाटील (बोरगाव) यांनी पंढरपूर येथील ड्रोन योगी कंपनीच्या माध्यमातून औषध फवारणी ड्रोन मशीनची खरेदी केली. सदर मशीनची साधारणता किंमत सात लाख रुपये इतकी असून त्याची औषध फवारणी कपॅसिटी दिवसाला 12 एकर इतकी आहे. एक एकर फवारणीसाठी साधारणता चार मिनिटाचा वेळ लागतो, सदर मशीन इलेक्ट्रिक बॅटरी वरती चालते,परिणामी मोठे शेती क्षेत्र असणारे चार पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सादर मशीनची खरेदी केल्यास अथवा शेती संस्थेच्या माध्यमातून खरेदी केल्यास त्याला सबसिडी ही मिळते अशी माहिती देण्यात आली.
सदर कुंभोज परिसरातील पहिला प्रयोग करण्यासाठी आज रविराज जाधव ,अमोल कदम यांच्या शेतामध्ये शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर मशीन मुळे पैसा व औषधाची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले









