कुंभोज / वार्ताहर
कुंभोज ता हातकणंगले येथील एसटी स्टँड पासून पुढे असणारा कारवान टेक प्रभाग क्र 6 परिसरातील रस्त्यासाठी नवबौद्ध घटकातून मंजूर असलेला निधी अन्य ठिकाणी वापरण्यात आल्याने नवबौध्द घटकातून तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींच्यातूंन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी कुंभोज ग्रामपंचायतचे सदस्य,माधुरी घोदे, अजीत देवमोरे व अमरजीत बंडगर यांनी केले आहे.
सदर कामाचे ठेकेदार यांनी मंजूर असलेल्या फंडातून सदर काम अन्य ठिकाणी आपल्या मनमानीने केली असून त्यासाठी ग्रामपंचायत कुंभोज अथवा परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती ,परिणामी सदर कामाचा फंड ग्रामपंचायत सदस्य,माजी सरंपच माधुरी घोदे अजित देवमोरे व अमरजीत बंडगर यांनी जिल्हा परिषद यांच्याकडे मागणी करून उपलब्ध करून घेतला होता.परिणामी सदर फंड जा रस्त्यासाठी मंजूर झाला तो रस्ता वगळून मंजूर फंडातून दुसरीकडेच रस्ता करण्यात आला, व त्या रस्त्याचा दर्जाही चांगला नाही त्यामुळे सदर कामाच्या ठेकेदार बाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून सदर कामाच्या ठेकेदारांच्या कामाची चौकशी व्हावी तसेच सदर फंडातून करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याबाबत आपण बांधकाम विभाग हातकणंगले यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिणामी सदर कामाचे ठेकेदारांनी मंजूर असलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा परिसरातील नागरिकांच्यातून आंदोलनाचा इशारा व संबंधित कामाच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे व अमरजीत बंडगर यांनी केले आहे.परिणामी याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार ग्रामपंचायत कुंभोज यांच्याकडे तक्रार करूनही ग्रामपंचायतीने सदर ठेकेदाराने आपल्या कामात कोणताही बदल केलेला नसल्याने चहापेक्षा किटली गरम असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर कामाचे ठेकेदार यांची कुंभोज परिसरात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी व मंजूर असलेल्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांतून होत आहे.