कुंभोज / वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले व परिसरात खोची नरंदे दुधगाव बाहुबली परिसरात पावसाने आज सायंकाळी पाच वाजता दमदार हजेरी लावली, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने तब्बल एक तास सुरू असलेल्या जोरदार पावसाने उन्हाळ्याची चाहूल कमी केली.
परिणामी ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पडलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण असून ज्या शेतकऱ्यांचे ऊस सोयाबीन हरभरा व शाळू अद्याप शेतामध्ये आहे अशा शेतकऱ्यांच्यातून मात्र सदर पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे .परिणामी तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ चालू असलेल्या पावसामुळे खोची कुंभोज परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे रस्त्यावर कोलमडली असून काही ठिकाणी विद्युत तारा तुटून रस्त्यावरती पडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे कोणत्या ऋतूत काय होणार याचा शेतकऱ्याचा ऋतू वरील विश्वासच उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. विनोद शिंगे कुंभोज