नवविवाहित महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरीच्या प्रकारात वाढ
महिलांच्या भीतीचे वातावरण, कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास उडाला
वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील शिवाजीनगर, शाहुनगर तसेच इंदिरानगर परिसरात सध्या भुरट्या चोरांना जोर आला असून, सदर परिसरातील महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण हिसकावून चोरुन नेण्याचा प्रकारात वाढ झाली आहे.
गेल्या दोन महिन्यात तीन ते चार ठिकाणी नवविवाहीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरून नेण्याचे प्रकार घडले असून, सदर चोरटे याच परिसरातील असावेत तसेच सदर घरातील अंदाज घेऊनच ही चोरी होत असावी असा अंदाज परिसरातील नागरिकांच्यातुन व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर व शाहूनगरमध्ये असणाऱ्या नवविवाहिता परिणामी कालरात्री शिवाजीनगर परिसरात एका नवविवाहित महिलेला घरात घुसून गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याचा प्रकार घडला. असाच प्रकार गेल्या दोन महिन्यात दोन ते तीन ठिकाणी घडला असून याबाबत हातकणंगले पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. केवळ गुन्हे नोंद होतात मात्र चोराचा शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्यात कायदा व सुव्यवस्था याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.









