ग्रामसचिवालय बांधकामाविरोधात लोकविकास आघाडीने न्यायालयात केली तक्रार
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले येथील अनेक महिन्यापासून चर्चेचा विषय व वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसचिवालय बांधकामाचा वाद शेवटी न्यायालयाच्या दरबारात गेला असून, लोकविकास आघाडीने ग्रामपंचायत कुंभोज यांना सदर बांधकामाबाबत न्यायालयाकडून नोटीस पाठवली असून. त्यामध्ये अनेक प्रश्नांचा उल्लेख केला गेला आहे.
याबाबत न्यायालयाने ग्रामपंचायत कुंभोज महाविकास आघाडीकडे याचा खुलासा मागितला असून सदर न्यायालयीन तारखेसाठी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. न्यायालयीन बाबी संदर्भात ग्रामपंचायत कुंभोज सरपंच, ग्रामविकास अधिकारी हे कोल्हापूर येथील कोर्टात हजर झाले आहेत. परिणामी लोकविकास आघाडीने गेल्या काही महिन्यापासून ग्रामपंचायत कुंभोज यांना बांधकाम चालू असणारी उपलब्ध, जागा ग्रामसचिवालयासाठी फारच कमी असून या ठिकाणी सर्वच शासकीय कायालय होणे अवघड आहे.
परिणामी येणाऱ्या भविष्याचा विचार करता ही इमारत सुसज्ज अशा ठिकाणी सर्व सोयीनियुक्त असावी अशी मागणी लोकविकास आघाडीच्या वतीने गटप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील यांनी केली होती. परिणामी याबाबत लोकविकास व महाविकास यांच्यात बऱ्याच शाब्दिक चकमकी उडाल्या, परिणामी लोकविकास आघाडीने सदर बांधकामाविरोधात न्यायालयात धाव घेतली असून सध्या ही बाब न्यायप्रविष्ट बनल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर लोकविकास आघाडीने पाठवलेल्या न्यायालीन नोटीसच्या विरोधात महाविकासआघाडी न्यायालयात हजर झाली असून ,याबाबत दोन्ही गटाचे वकीलांनी आपली बाजू मांडली.
परिणामी याबाबत पुन्हा एकदा कुंभोज परिसरात ग्रामसचिवालयाचा बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच ग्रामसचिवालय चे बांधकाम मोठ्या गतीने सुरू असून याबाबत नागरिकातून मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी याबाबत न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.