घरकुल आवास योजनेसह माकडाचे होणारे हल्ले यावर चर्चा
कुंभोज / प्रतिनिधी
कुंभोज, ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीची मासिक ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 15 वित्त आयोगातून खर्च करण्यात येणाऱ्या रकमेचा आराखडा आज ग्रामसभेसमोर कुंभोज ग्रामविकास अधिकारी विलास फोलाने यांनी मांडला. यावेळी कुंभोज ग्रामपंचायत सन 2022 साठी 15 वित्त आयोगातून खर्च होणाऱ्या वार्षिक आढावा साधारणत: एक कोटी रुपये पर्यंत असून त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक अशा विविध विषयांचा खर्चाचा आढावा घेण्यात आला. घरकुल आवास योजना मंजूर करताना पात्र नागरिकांवर अन्याय, अपात्र नागरिकांचा पात्र यादीत समावेश यासाठी शासन दरबारी न्याय मागणे यासह कुंभोज मासिक ग्रामसभेत घरकुल आवास योजनेवर चर्चा झाली.
सदर 15 वित्त आयोग मंजूर वार्षिक खर्चाच्या आढाव्याचे वार्षिक बजेट मांडण्यात आले. तसेच घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 198 लोकांची यादीचे वाचन करण्यात आले. कुंभोजसाठी मंजूर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन जागा प्रकल्पवरती चर्चा करण्यात आली,त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजनगरात गेल्या दोन महिन्यापासून थैमान मांडलेल्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, परिणामी सदर भागातील महिलांच्या वर मोठ्या प्रमाणात माकडाचे होणारे हल्ले ही गंभिर बाब असून यामध्ये जीवित हानी होऊ शकते. त्यासाठी ग्रामपंचायतीने सदर माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार विनोद शिंगे यांनी ग्रामसभेत केले.
यावेळी ग्रामपंचायत लवकरच योग्य ते निर्णय घेईल असे मत हे उपसरपंच दावीत घाटगे यांनी मानले, यावेळी कुंभोज घरकुल आवास योजनेतील मागासवर्गीय समाजातील नामंजूर करण्यात आलेली घरकुले कोणत्या कारणास्तव नामंजूर करण्यात आली, परिणामी त्यामध्ये बऱ्याच पात्र नागरिकांनाही शासनाने अपात्र ठरवले आहे त्याबाबत आपण शासन दरबारी न्याय मागणार असल्याचे मत माजी सरपंच किरण नामे यांनी मांडले. तसेच अपात्र असुनही पात्र ठरलेल्या योजना धारकांच्या ग्रामपंचायत कुंभोज यांच्याकडे लेखी तक्रारी करण्यात याव्यात त्यांच्यावर ती कारवाई केली जाईल असे मत ग्रामविकास अधिकारी विलास फोलाने यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ माधुरी घोदे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री जाधव, शुभांगी माळी, विषाखा माळी, पद्मावती पाटील ,रावसाहेब पाटील,सुदशन चौगुले, सदाशिव महापुरे आप्पासाहेब चौगुले, संभाजी मिसाळ, भारती पोतदार तसेच ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रामपंचायत कर्मचारी अमर पवार व आभार ग्रामपंचायत सदस्य भरत भोकरे यांनी मानले.









