कुंभोज /प्रतिनिधी
कुंभोज तालुका हातकणंगले येथे शेतकऱ्याच्या विरोधात असणाऱ्या वेगवेगळ्या धोरणांच्या विरोधात आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी त्या अनुषंगाने आज कुंभोज येथे सर्वपक्षीय बंदला सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली यामध्ये व्यापारी शिक्षण संस्था बँका, आठवडा बाजार,तसेच सर्वच स्तरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन बंदला शंभर टक्के पाठिंबा दिला सकाळी रॅली काढून सरसकट कर्जमाफी, बाहेरील देशातून आयात करणार येणारा शेतीमाल याला विरोध करण्यात आला.
आर. सी. इ. एफ.करारा नुसार चीन, मलेशिया. सारख्या पर देशातून दूध, केळी,तांदूळ अशी पदार्थ आयात करण्यात येणार आहेत व त्यामुळे दुध, तांदूळ इत्यादी मालाचे भाव कमी होणार आहेत त्यामुळे शेतकरी संकटात येणार. तसेच ह्या वर्षी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडले आहेत व आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी व इतर विविध मागण्यांकरीता सर्वपक्षीय हा बंद पाळण्यात येत आहे.
या बंदमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष, शेतकरी संघटना, बजरंग दल, तसेच माजी सरपंच प्रकाश पाटील, किरण माळी, विजय भोसले, सुनील भोसले, सचिन कोळी, विश्वजीत माने, सचिन भोकरे तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी तसेच सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.









