वार्ताहर / कुंभोज
आकाराने व विस्ताराने मोठे असणाऱ्या कुंभोज गावात भारतीय स्टेट बँक यांनी सर्वसामान्य लोकांच्या व शेतकऱ्यांच्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी चालू केलेले ग्राहक सेवा केंद्र नक्कीच जनतेच्या फायद्याचे ठरेल, परिणामी जनतेने शासनाच्या व बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी केले
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र कुंभोज चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बँक शाखा हातकणंगलेचे शाखा अधिकारी शशिकांत पाटील हे होते. यावेळी सदर ग्राहक सेवा केंद्रात मिळणाऱ्या सेवा सुविधा, नूतन बँक पासबुक, एटीएम कार्ड ,ग्राहकांना मिळणारे विमा संरक्षण, पैशाची देवाण घेवाण, आधी विषयाची माहिती बँकेचे शाखाधिकारी शशिकांत पाटील यांनी दिली. यावेळी फादर गायकवाड यांनी सुवासे परिवाराच्यावतीने संपूर्ण देशावर आलेले कोणाचे महाभयंकर संकट टाळावे यासाठी प्रभू येशूची प्रार्थना केली. यावेळी गेल्या अनेक वर्षापासून कुंभोज ग्रामस्थांची असणारी मागणी पूर्ण केल्याबद्दल भारतीय स्टेट बँकेच्या कॅशियर जान्हवी विजय सुवासे यांचा सत्कार कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सदर सेवा केंद्राचे उद्घाटन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले,पत्रकार शिवकुमार सोने,विश्वास मोहिते,फादर गायकवाड, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









