वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील वाढता कोरोनाचा प्रदुर्भाव पाहता रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनामुळे मयत झालेल्यांची संख्या 8 च्या घरात पोहोचली आहे. यावरती उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत कुंभोज गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कोरोना कमिटी, तंटामुक्ती कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या बैठकीत कुंभोज गावात सोमवारपासून पाच दिवसासाठी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतला असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार जनता कर्फ्यू लागू करण्यात येत असल्याची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली, परिणामी या कालावधीमध्ये मेडिकल दवाखाने व दूध डेअरी वगळता सर्व सेवा पाच दिवसासाठी पूर्णपणे बंद राहणार असून कुंभोज येथील आठवडा बाजार ही बंद राहणार आहे. परिणामी सदर जनता कर्फ्यू कालावधीमध्ये कोणत्याही नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना शंभर रुपये दंडाची कारवाई ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच सदर कालावधीत गावात महिला बचत गटाने कोणत्याही प्रकारची वसुली अथवा बैठक घेऊ नये अशी सूचना करण्यात आल्या आहेत.
Previous Articleकर्नाटक : आर्थिक मदतीसाठी केंद्रावर दबाव आणावा – सिद्धरामय्या
Next Article जयसिंगपुरात करोना सेंटर लोकार्पण सोहळा संपन्न









