कुंभोज / वार्ताहर
कुंभोज ( ता. हातकणंगले ) येथे होळकर ग्रुप ,श्री बिरदेव कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर दोन दिवसीय 60 किलो वजनी गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या.
त्यामध्ये 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक शिवमुद्रा क्रीडा मंडळ, कौलव , द्वितीय क्रमांक सर्वेश्वर क्रीडा मंडळ ,शिरोली , तृतीय क्रमांक शिवप्रेमी क्रीडा मंडळ ,शिरोली यांनी पटकाविला सर्व संघांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवमुद्रा क्रीडा मंडळ कौलवचा सुधीर हुजरे, उत्कृष्ट पकड म्हणून सर्वेश्वर क्रीडा मंडळ शिरोलीचा श्रीराम खवरे तसेच उत्कृष्ट चढाई म्हणून शिवप्रेमी क्रीडा मंडळ शिरोलीचा अतुल राजपूत यांनी बहुमान मिळाला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोकराव माने ,वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे, किरण माळी, संदीप कारंडे , अमरसिंह पाटील, सरपंच माधुरी घोदे ,उपसरपंच दाविद घाटगे, ग्रा. पं. सदस्य अनिकेत चौगुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतेे. स्वागत प्रवीण भानुसे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी पालखे यांनी केले .आभार संतोष पुजारी यांनी मानलेे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संदीप लवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी होळकर ग्रुप, श्री बिरदेव कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी परिश्रम घेतले








